रौद्र

 

उतरती संध्याकाळ
वातावरण ढगाळ
एक चिमुकला बाळ
……..खेळे अंगणात

वारा सुटला जोरात
आई बोलावे घरात
पाणी साठले ढगात
……..होणार बरसात

उठले वीजेचे तरंग
सारे पावसाचे रंग
बाळ खेळण्यात दंग
…….आपल्या नादात

आली वीजेला लहर
केला उगीच कहर
कडाडली बाळावर
……..बाळाचा थरकाप

आईच्या कुशीत घुसून
बाळ रडे हमसून
वीज कडाडे हसून
……..माज भलताच

आई पसरे पदर
बाई थांबव कहर
कर मायेची कदर
…….. बाळ पदरात

वीज माजाच्या भरात
म्हणे उन्मत्त स्वरात
घेशी बाळा पदरात
…….. तू काय कामाची ?

माझ्या येइल मनात
तुझ्या शिरेन घरात
राख होइल क्षणात
………तुझ्या बाळाची

वीज बोलता अभद्र
जागे मायेताला रौद्र
पेटे वणवा सर्वत्र
……..मायेचा हा राग

थरथरले आकाश
हदरले अवकाश
तिच्या डोळ्यात विनाश
………..नजरेत आग

जळाले सारे मेघ
पड़े धरणीला भेग
वीजेची कोसळली रेघ
………झाली राख राख !

धुंद रवी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s